रत्नागिरीओखा एक्स्प्रेस रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

ओखा एक्स्प्रेस रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

ओखा एक्स्प्रेस रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वेस्थानक परिसरात ओखा एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनदोरा रमेश देवजी (वय 48, रा. जामनगर, गुजरात) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्थानक येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरातहून गोव्याकडे प्रवास करत होते. याच दरम्यान संगमेश्वर स्थानकाजवळ ते रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच 20 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची नोंद रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...