रत्नागिरीरत्नागिरीत दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

रत्नागिरीत दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

रत्नागिरीकरांसाठी शनिवारचा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील साळवी स्टॉप परिसरात विकसित करण्यात आलेल्या आकर्षक कोपऱ्याचे तसेच ‘श्रीमंत भागोजी शेठ कीर’ यांच्या स्मारकाचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

हे स्मारक केवळ एक वास्तू नसून रत्नागिरीच्या समृद्ध इतिहासाची आणि विकासाची साक्ष देणारे प्रतीक आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर,श्री देव भैरी जोगेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष रविंद्र उर्फ मुन्ना सुर्वे, माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, राहुल पंडित, राजेंद्र महाडीक, सुदेश मयेकर, नगरसेवक राजू किर उद्योजक प्रसन्न आंबुलकर व नगरसेवक ,नगरसेविका. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

♟️ मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन♟️मुंबई विद्यापीठाची...