रत्नागिरीकोकणातील समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे झाले आगमन

कोकणातील समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे झाले आगमन

कोकणातील समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे झाले आगमन–

२०२६ हंगामातील पहिले दर्शन; समुद्री जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार यांची नोंद–

👉दापोली तालुक्यातील हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी दरवर्षी हिवाळी हंगामात दिसणाऱ्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांचे आगमन यंदाही सुरू झाले आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी हर्णे-पाळंदे बीच परिसरात ‘सीगल’ (Seagull) पक्ष्यांचे २०२६ हंगामातील पहिले दर्शन झाले.

समुद्री जीव व अधिवास संवर्धन संशोधक फहाद जमादार हे नेहमीप्रमाणे हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी नियमित गस्त घालत असताना आणि समुद्री जैवविविधतेचे निरीक्षण करत असताना त्यांना समुद्रकिनारी सीगल पक्षी आढळून आले. या निरीक्षणाची त्यांनी नोंद केली आहे. त्यामुळे यंदाच्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांच्या हंगामाला सुरुवात झाल्याचे प्राथमिक निरीक्षण समोर आले आहे.

हर्णे-पाळंदे परिसरातील समुद्रकिनारा हा विविध प्रकारच्या समुद्री जीवसृष्टीसह स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास मानला जातो. विशेषतः हिवाळ्याच्या काळात या परिसरात विविध समुद्री व किनारी पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.

स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन हे परिसरातील समुद्री आणि किनारी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अशा पक्ष्यांचे नियमित निरीक्षण, छायाचित्रण, नोंदणी आणि अधिवासाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. हर्णे-पाळंदे किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी अशा नोंदी भविष्यात उपयुक्त ठरू शकतात.

यंदाच्या हंगामात पुढील काळात सीगलसह आणखी कोणकोणते स्थलांतरित पक्षी हर्णे-पाळंदे किनारपट्टीवर दाखल होतात, याकडे पक्षीप्रेमी आणि समुद्री जैवविविधता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

Breaking News

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात; अंगणवाडी परिसर...

सेवा संकल्प अभियानांतर्गत लांजात माजी सैनिक मेळावा संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत लांजात माजी सैनिक मेळावा संपन्न; ९...