रत्नागिरीसेवा संकल्प अभियानांतर्गत लांजात माजी सैनिक मेळावा संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत लांजात माजी सैनिक मेळावा संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत लांजात माजी सैनिक मेळावा संपन्न;

९ प्रकरणांचा जागेवरच निपटारा
रत्नागिरी, (जिमाका) : रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत लांजा येथील तहसीलदार कार्यालय सभागृहात माजी सैनिक मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा लांजा तालुक्याच्या तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या मेळाव्यास २५ वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक, विधवा व पाल्य (अवलंबित) उपस्थित होते. तहसीलदार प्रियांका ढोले यांनी उपस्थितांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा यथोचित सन्मान केला.
निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. माजी सैनिकांनी केलेल्या देशसेवेचा सर्वांना सार्थ अभिमान असून प्रशासनाकडून त्यांच्या अडचणी व प्रश्नांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देऊन ते मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांनी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन पात्र घटकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात ९ वीर नारी, वीर माता-पिता व माजी सैनिकांच्या अडीअडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरितांना आवश्यक ते प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्याण संघटक राहुल काटे यांनी मानले.

Breaking News

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम उत्साहात; अंगणवाडी परिसर...

कोकणातील समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे झाले आगमन

कोकणातील समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे झाले आगमन-- २०२६ हंगामातील पहिले दर्शन;...