Home रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन

रत्नागिरी, (जिमाका)- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत कार्यालय व स्काऊट आणि गाईड कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा योग संघटना यांच्या सहकार्याने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन येथील जिल्हा क्रीडा संकुलात झाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास विविध कार्यालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर तसेच शाळा महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर रा. भा. शिर्के विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. रत्नागिरी जिल्हा योग संघटनेचे राजेश आयरे यांच्यामार्फत प्रोटोकॉलप्रमाणे सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून नियोजनबद्ध पद्धतीने योगासने घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा योग संघटना यांच्यावतीने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेचे आयोजन दिनांक १९ जून रोजी रा. भा. शिर्के प्रशाला येथे घेण्यात आले होते. या स्पर्धेमधील विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here