रत्नागिरीजैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ महिला शेतकरी सन्मान योजनेसह विविध शासकीय...

जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ महिला शेतकरी सन्मान योजनेसह विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन

‘जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ महिला शेतकरी सन्मान योजनेसह विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन
रत्नागिरी,  (जिमाका : धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि शासकीय योजनांची माहिती थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महिला शेतकरी सन्मान योजनेसह कृषी व इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांनी शासकीय योजनांचा थेट लाभ कसा घ्यावा याविषयी ग्रामस्थ व गणेशभक्तांना मार्गदर्शन केले:

  • सहाय्यक कृषी अधिकारी विशाल शिंदे यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, अनुदाने आणि आधुनिक शेतीविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
  • नाटे विभागाच्या सुपरवायझर स्नेहल डांगमोडेकर-जाधव यांनी महिला शेतकरी सन्मान योजना व महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनांवर प्रकाश टाकत, जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
    मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
    या सामाजिक उपक्रमासाठी सागवे जिल्हा परिषद सदस्य सोनाली ठुकरूल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक महिला शेतकरी, ग्रामस्थ आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारे जनकल्याणाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या माहितीपर संवादामुळे शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Breaking News

4rabet Casino Depositing Guide: Payment Methods

When you join a new online casino, the first...

Exploring 1xbet Casino Game Selection

As online gambling continues to evolve, players increasingly look...