सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध स्पर्धात उल्लेखनीय यश- आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण—
👉सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व सर्जनशील विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्याना सहभागी करण्यात येते . चिपळूण येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांची व कौशल्यांची चुणूक दाखवली. यामध्ये प्रज्ञाशोध स्पर्धेत अमन स्वप्निल कांबळे व रिवांश विनायक वरुडे या विद्यार्थ्यांनी चौथा क्रमांक,रेहांश नरेश चाळके पाचवा क्रमांक तर हस्ताक्षर स्पर्धेत आराध्या दिनेश कदम चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे .या सर्व विद्यार्थ्यांना आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी चिपळूण चे नगराध्यक्ष श्री उमेश सकपाळ साहेब व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर , मनिषा कांबळी व अपूर्वा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंद व पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .त्यामुळे विद्यालयातील इतरही विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे .शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, कला, संस्कार, वाचन, वक्तृत्व व विविध सर्जनशील उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्साहामुळे शाळेतील वातावरण आनंदमय व प्रेरणादायी झाले .मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळत असून, “शिकूया, खेळूया आणि घडूया” या उद्देशाने शाळेची वाटचाल सुरू आहे. या उपक्रमासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे श्री. बागवे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
