नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात मंगळवारी सार्वजनिक सुट्टी

0
48

रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) : जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदा व लांजा,देवरूख, गुहागर या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका-2025 करिता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग, सामान्य प्रशासन विभाग बुधवार नोव्हेंबर 26, 2025 रोजीच्या अधिसूचनेद्वारे रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदा व लांजा,देवरूख, गुहागर या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका-2025 करिता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुदृट्टी उक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये,सार्वजनिक उपक्रम, बँका इ.ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here