रत्नागिरीफातिमा इमरान धामासकर यांची ‘Women Icon Award 2026’ साठी निवड

फातिमा इमरान धामासकर यांची ‘Women Icon Award 2026’ साठी निवड

फातिमा इमरान धामासकर यांची ‘Women Icon Award 2026’ साठी निवड
रत्नागिरी : मजगांव, येथील फातिमा इमरान धामासकर हिची Graphic Designing आणि Digital Marketing क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत Women World Records आयोजित ‘Women Icon Award 2026’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
फातिमाने आपल्या मेहनत, जिद्द, सर्जनशीलता आणि कौशल्याच्या जोरावर डिजिटल क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशामुळे मजगांव तसेच रत्नागिरी परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फातिमाच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन, प्रेम आणि सततचा भक्कम पाठिंबा मोलाचा ठरला आहे. तिच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारानेही तिच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
फातिमाचे शालेय शिक्षण एम. एस. नाईक स्कूल येथे झाले असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्या कुटुंबीयांना आणि शाळेलाही अभिमान वाटत आहे.
फातिमा इमरान धामासकर हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🏆

Breaking News

Exploring 1xbet Casino Game Selection

As online gambling continues to evolve, players increasingly look...

‘सेवा संकल्प अभियाना’मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य

'सेवा संकल्प अभियाना'मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य;...