रत्नागिरी'सेवा संकल्प अभियाना'मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य

‘सेवा संकल्प अभियाना’मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य

‘सेवा संकल्प अभियाना’मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरी, (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी कु. हर्षाली सीताराम मोरे हिला नवीन हास्य मिळाले आहे. तपासणीदरम्यान तिच्यामध्ये ‘दुभंगलेले ओठ आणि टाळू’ (क्लेफ्ट लिप व पॅलेट) हा जन्मजात दोष आढळून आला होता. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) समन्वयातून डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या योजनेअंतर्गत तिच्यावर यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर या लहानग्या लाभार्थीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, डॉ. गायत्री फडके, श्री. तायडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. हल्ये मॅडम, आरबीएसके पथक तसेच स्थानिक अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी हर्षालीच्या आरोग्याची सविस्तर पाहणी करून तिच्या पुढील देखभालीबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. वेळेवर झालेली तपासणी आणि तत्पर वैद्यकीय उपचारांमुळे चिमुकल्या हर्षालीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभाग व शासनाच्या या अभियानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Breaking News

Exploring 1xbet Casino Game Selection

As online gambling continues to evolve, players increasingly look...

फातिमा इमरान धामासकर यांची ‘Women Icon Award 2026’ साठी निवड

फातिमा इमरान धामासकर यांची ‘Women Icon Award 2026’ साठी...