रत्नागिरीभारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या...

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या विषयावर भाजपची रत्नागिरी विधानसभा बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या विषयावर भाजपची रत्नागिरी विधानसभा बैठक संपन्न

सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता SIR (विशेष सखोल पुनरावलोकन)या उपक्रमा विषयी आणि 6 एप्रिल भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालय येथे ही बैठक संपन्न झाली.
श्री दादा ढेकणे यांची भारतीय जनता पार्टी प्रदेशाकडून एस.आय.आर साठी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी दादा ढेकणे यांनी भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम याबाबत माहिती उपस्थितांना दिली. त्याचप्रमाणे एस आय आर यासाठी पक्षाने नियुक्त केलेले BLO-2 यांना आपले काम समजावून सांगितले. व त्यादृष्टीने काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर शहर सरचिटणीस निलेश आखाडे, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले. शहर सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याच कार्यक्रमांमध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून अशोक वाडेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भाजपा स्थापना दिना निमित्त राबविण्यात येणारे कार्यक्रम स्वच्छता मोहीम, कार्यालयातील पूजा, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम, संपर्क अभियान, पक्ष ध्येयधोरणे याबाबत मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना त्याचे लाभार्थी आणि त्यांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक संपर्क यांसारखे कार्यक्रम स्थापना दिना निमित्त राबविण्यात येणार असल्याचे दादा ढेकणे यांनी सांगितले. यावेळी राजू भाटलेकर, संदीप नाचणकर, मनोज पाटणकर, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...