भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये 'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात साजरा

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ उत्साहात साजरा

*भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ उत्साहात साजरा!
भारत शिक्षण मंडळाच्या ‘पटवर्धन हायस्कूल’ मध्ये २३ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ अत्यंत उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. घाटवीलकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ऑलिंपिक दिनाचे महत्त्व पटवून देताना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
*ऑलिंपिकचा इतिहास आणि भारताच्या यशाचा गौरव:*
मुख्याध्यापिका घाटवीलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ऑलिंपिक खेळांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्रीसमध्ये सुरू झालेल्या प्राचीन ऑलिंपिकपासून ते आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांपर्यंतचा रंजक इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच, जागतिक पातळीवरील या सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभातील भारताच्या अभिमानास्पद कामगिरीचा आलेखही त्यांनी स्पष्ट केला. हॉकीमधील भारताचे सुवर्णकाळ, वैयक्तिक पदके आणि अलिकडच्या काळात भारतीय खेळाडूंनी मिळवलेले दैदिप्यमान यश याबद्दल सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करण्याची प्रेरणा दिली.
याप्रसंगी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. साळुंखे सर, श्री. पालकर सर, श्री. पाडाळकर सर आणि श्रीमती काटकर मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते. मुख्याध्यापिकांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने भारावून जात विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा नवा संकल्प केला. या कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Breaking News