महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानेदिवाळी पाडव्याच्या पहाटे चिपळूणमध्ये सुरांची बरसात

0
7

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने
दिवाळी पाडव्याच्या पहाटे चिपळूणमध्ये सुरांची बरसात; ‘स्वर दिवाळी पहाट’ला जिल्हावासीयांचा उदंड प्रतिसाद
अमोल बावडेकर आणि ईशानी पाटणकर यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध
अभंग, भक्तीगीते आणि भावगीतांच्या सुरेल मेजवानीने पाडव्याची पहाट अविस्मरणीय
रत्नागिरी,  (जिमाका) : दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे चिपळूण नगरीत संगीताची अनोखी अनुभूती अनुभवायला मिळाली. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दिवाळी पहाट’ या विशेष संगीत मैफलीस चिपळूणकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला.
पहाटेच्या प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या या मैफलीत प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि सुप्रसिद्ध गायिका ईशानी पाटणकर यांच्या सुरेल स्वरांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. बावडेकर यांच्या दमदार आणि भावस्पर्शी गायकीने मैफलीत रंग भरला, तर ईशानी पाटणकर यांच्या मधुर आवाजाने रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमात सादर झालेल्या एकापेक्षा एक सरस अभंग, भक्तीगीते आणि लोकप्रिय मराठी भावगीतांमुळे सभागृहात भक्तीरस आणि संगीताचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
सणासुदीच्या गडबडीतून वेळ काढत चिपळूणसह जिल्ह्याच्या विविध भागांतून संगीतप्रेमींनी पहाटेच मोठी गर्दी केली होती. सांस्कृतिक कार्य विभागाच्या या दर्जेदार उपक्रमामुळे चिपळूणकरांची दिवाळी पाडव्याची सुरुवात सुरेल आणि अविस्मरणीय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here