Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरण ने केली नियंत्रण कक्षाची स्थापना..

रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरण ने केली नियंत्रण कक्षाची स्थापना..

रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरण ने केली नियंत्रण कक्षाची स्थापना..

रत्नागिरी जिल्ह्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महावितरणचे पोल पडणे, वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होत आहे. अशा वेळी ग्राहकांना वीज पुरवठ्या बाबत वेळेत व अचूक माहिती मिळावी म्हणून महावितरणने रत्नागिरी येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहक आपत्कालीन कक्षाच्या 7875765018 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ग्राहक सेवेत हा क्रमांक चोवीस तास सुरु असणार आहे.

टोल फ्री क्रमांकावर ही करता येते तक्रार

विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ०२२-५०८९७१०० या क्रमांकाला मिस कॉल केल्यानंतर सुद्धा वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाते किंवा NOPOWER

अपडेट्स मिळवा मोबाईलवर

मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर माहिती SMS वर पाठविली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी MREG_ (उदा. MREG 123456789012) असा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ क्रमांकावर पाठवावा.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here