रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात...

रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी येथील एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी,  : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त M.S. Naik Primary English medium School येथे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी विविध योगासने, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शाळेच्या प्रांगणात सकाळी आयोजित कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.संस्थेचे अध्यक्ष श्री नोमान नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अकीब काझी,शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.आरिफा म्हालदार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अशफाक नाईक यांनी
यावेळी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे, एकाग्रता वाढविण्यातील योगाचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांना दररोज काही वेळ योगासाठी देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “योग करा, निरोगी राहा” हा संदेश देत योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प केला. योग दिनाच्या या उपक्रमामुळे शाळेत आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.

Breaking News

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन’ उत्साहात साजरा

*भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये 'आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन' उत्साहात...