Home रत्नागिरी स्वसंरक्षण ही काळाची गरज – नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी – संकेता संदेश सावंत यांच केलं कौतुक

स्वसंरक्षण ही काळाची गरज – नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी – संकेता संदेश सावंत यांच केलं कौतुक

0
स्वसंरक्षण ही काळाची गरज – नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी – संकेता संदेश सावंत यांच केलं कौतुक

रत्नागिरी – ” स्वतःच संरक्षण करता येणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तायक्वांदो सारखा मार्शल आर्ट चा प्रकार आजच्या काळातल्या मुलींनी तसेच मुलांनीही अवश्य शिकून घ्यावा असं आवाहन नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुलकर्णी यांनी केलं आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुलकर्णी यांनी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय पंच संकेता संदेश सावंत यांची भेट घेतली यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
गेल्या वर्षभरापासून अभ्युदय नगर नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृहात ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. या प्रशिक्षण केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील मुलं तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण घेतात. नुकत्याच झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेतही या प्रशिक्षण केंद्रातल्या खेळाडूंनी उत्तम यश संपादन केल आहे. या प्रशिक्षण केंद्रात मुलांना तायक्वांदो या खेळाचं प्रशिक्षण देत असतानाच संकेता संदेश सावंत यांनी नुकतंच लातूर तसंच गोवा येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केलं. पदकविजेती खेळाडू, राष्ट्रीय पंच ते प्रशिक्षक अशा तिच्या या प्रवासाची नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेटीत माहिती घेतली. यावेळी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संकेता संदेश सावंत हिला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here