रत्नागिरीमच्छिमारांची लूट करणाऱ्या रत्नागिरी येथील फिशमिल मालकांना माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण...

मच्छिमारांची लूट करणाऱ्या रत्नागिरी येथील फिशमिल मालकांना माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी लावला थेट फोन आणि केली कान उघडणी आणि सुनावले खडे बोल

मच्छिमारांची लूट करणाऱ्या रत्नागिरी येथील फिशमिल मालकांना माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी लावला थेट फोन आणि केली कान उघडणी आणि सुनावले खडे बोल–

👉भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष आणि मच्छिमारांचे नेते अब्दुल बिजली खान यांनी रत्नागिरी मिरजोळे एमआयडी‌सी येथील फिशमिल कंपन्यांचे मालक मनमानी करुन गरीब मच्छिमारांवर अन्याय करीत असल्याने मुंबई येथे जाऊन थेट माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दरबारात जाऊन लेखी तक्रार देत तोंडीं कैफियत मांडली. बिजली खान यांच्या तक्रारीनंतर खासदार नारायण राणे संतप्त झाले आणि त्यांनी फिश मिल मालकांना आपल्या मोबाईल वरुन थेट फोन लावला आणि चांगलीच खरटपट्टी करीत मच्छिमारांवर अन्याय करणार असाल तर याद राखा.मी सोडणार नाही असे सांगून चर्चा करण्यासाठी कणकवली येथे बोलावले आहे. खासदार नारायण राणे यांच्या फोन नंतर फिशमिल मालकांचे धाबे दणाणले असून ते आता दर कमी जास्त करु लागले आहेत.. अब्दुल बिजली खान हे नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाची दखल घेत मंत्र्यांकडे लेखी निवेदन देत असतात. आणि त्याच नुसार त्यांनी फिश मालकांच्या मनमानी कारभाराची दखल घेत थेट मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या कडे लेखी तक्रार दिली आहे..
👉रत्नागिरी मिरजोळे एम.आय‌.डी सी येथील फिशमिल कंपन्यांचा दर कमी करण्याच्या मनमानीची रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 32 किलोच्या एका टबमधील छोट्या मासळीला फिशमिल कंपन्यांनी 1800 रुपये दर दिला. लगेचच पुढच्या आठवड्यात टबचा दर 1100 रुपयांवर आणला गेला . त्यामुळे प्रति आठवडा स्थानिक मच्छिमारांचे 10 ते 12 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच खासदार राणे यांनी कंपनी मालकांना संपर्क साधून बैठकीला आमंत्रित केले असल्याचे अब्दुल बिजली खान यांनी सांगितले .
रत्नागिरी,नाटे,जयगड येथून रत्नागिरीतील फिशमिल कंपन्यांना सुमारे 1 हजार टन छोटी मासळी विकली जाते परंतु रोजच्या रोज या मासळीचे दर कमी करुन स्थानिक मच्छिमारांना कशाप्रकारे आर्थिक नुकसानीत आणले जाते याबाबतची तक्रार खासदार नारायण राणे यांच्यासह मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केल्याची माहिती अल्पसंख्यांक नेते अब्दुल बिजली खान यांनी दिली.
यावर खासदार नारायण राणे यांनी मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने फिशमिल कंपनी मालकांशी संपर्क साधून यासंदर्भात बैठकीला आमंत्रित करण्यात आले अससल्याचे यावेळी सांगितले… मच्छीमारांच्या जीवावर मोठे झालेल्या फिशमिल मालकांविरुद्ध थेट मंत्री आणि खासदारांकडे तक्रार करून जे धाडस अब्दुल बिजली खान यांनी दाखवले आहे त्याबद्दल मच्छिमारां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे..

Breaking News