महाराष्ट्रमानेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश

मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश

शैक्षणिक वर्ष 2024 – 25 चा
मानेज इंटरनॅशनल स्कूल,सी. बी.एस. ई बोर्ड चा इयत्ता दहावी व बारावी चा निकाल  जाहीर झाला त्यामध्ये मानेज इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100% लागला असून इयत्ता दहावी मध्ये कुमार सर्वांभ बोरकर याने ९८% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कुमारी भक्ती सालपेकर हिने ९६.६०% व कुमार अतितोष अजित धनगर याने ९५.६०% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.
दहावी इयत्तेतील १० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.
इयत्ता बारावी सायन्स शाखेतील कुमारी जागृती संजय मसुरकर हिने ९३.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
कुमारी अनन्या रमाकांत गुरव ८१.६०% व जुई विशाल देसाई ८०.४०% या विद्यार्थिनींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन व प्रशालेच्या प्राचार्या यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे व त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…

Breaking News