रत्नागिरीमुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रास भेट

मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रास भेट

मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रास भेट–
रत्नागिरी, महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अभियानाच्या कालावधीत सागरी जैवविविधता, सागरी पर्यावरण संवर्धन आणि संशोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई श्री. प्रवीण एन. आर. यांनी भेट दिली.भेटीदरम्यान श्री. प्रवीण एन. आर. यांनी संशोधन केंद्रातील मत्स्यालय व संग्रहालयाची पाहणी केली तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी केंद्रात उभारण्यात आलेल्या ‘सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्रा’ची देखील पाहणी करून त्याबाबतची माहिती जाणून घेतली. केंद्रामार्फत सागरी जैवविविधता संवर्धनासाठी करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून कामाचे कौतुक केले.
यावेळी DFO श्रीमती प्रियांका पाटील, RFO श्री. प्रशांत निकळजे, श्री. विक्रम यादव, राज्य प्रकल्प अधिकारी, UNDP-GCF-ECRICC प्रकल्प, जलजीविका संस्थेचे श्री. दशरथ उपस्थित होते.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख, व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी यांनी श्री. प्रवीण एन. आर. यांचे स्वागत करून केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध संशोधन, संवर्धन व जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. मनोज घुघुसकर, डॉ. हरीश धमगाये व प्रा. सचिन साटम उपस्थित होते. तसेच UNDP प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक सहायोगी श्री. ऋषिकेश भाटकर, श्री. मिलिंद डाफळे तसेच श्री. किरण पाचरणे, वनपाल, रत्नागिरी तसेच रत्नागिरी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंबा, काजू,...