रत्नागिरीवाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुस्तक परिचय, सामूहिक वाचन, अभिवाचन अशा विविध उपक्रमांद्वारे वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘तृतीय रत्न’ या साहित्यकृतींचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकवृंदाने उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Breaking News

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेटरत्नागिरी, (रत्नागिरी...