महाराष्ट्रदेवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे या ग्राम सदस्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

नामदार नितेश राणे हे पालकमंत्री असल्याने आता नेतृत्वाखाली आपल्या भागाचा विकास होणार आहे हा विकास व्हावा म्हणून आपण नामदार नितेश राणे यांचे नेतृत्व व भाजपा पक्ष म्हणून मान्य केले आहे.

या वेळी माजी आमदार एड. अजित गोगटे, बाळ खडपे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, उत्तम बिरजे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News