रत्नागिरीएम्.एस्. नाईक स्कूल मध्ये रमजान उत्साहात साजरा…

एम्.एस्. नाईक स्कूल मध्ये रमजान उत्साहात साजरा…

रत्नागिरी- एम्.एस्. नाईक स्कूल, चाईल्ड केअर नर्सरी आणि प्राथमिक विभागामध्ये रमजान निमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी मुलांनी सुराह.अल. आला, नाशीद व छोटी भाषणे, नजम अप्रतिम रित्या सlदर केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री अश्फाक नाईक, तसेच प्राथमिक व नर्सरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार व शाळेचे शिक्षक मौलाना जकी सिद्दिकी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. सिद्दिक बारगीर यांनी उत्तम रित्या केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन श्री.मौलाना उसामा हज्जू व हाफिज शब्बीर हज्जू यांनी केले. सौ. आरिफा म्हालदार यांनीआपल्या भाषणामध्ये मुलांना उत्तमरित्या रमजान महिन्या बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच मौलाना जकी यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी हाफिज शब्बीर यांनी मान्यवरांचे व सर्व शिक्षकांचे आभार मानले.

Breaking News

अली पब्लिक स्कूल सावर्डेचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळेसावर्डे...