रत्नागिरीसावर्डे विद्यालयात नो व्हेकल उपक्रम

सावर्डे विद्यालयात नो व्हेकल उपक्रम

सावर्डे – सध्याचे वाढते प्रदूषण, निसर्गाची होणारी हानी आणि खनिज द्रव्यांचा अतिवापरामुळे पर्यावरणाची होत चाललेला ऱ्हास याबाबत शालेय कालावधीतच मुलांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने गांधी तीर्थ जळगाव यांच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली नो व्हेकल डे उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक आठवड्यातील शनिवारी वैयक्तिक वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा बस,सायकल, पायी चालणे या माध्यमातून विद्यालयांमध्ये येतात व शाळा सुटल्यानंतर अशाच प्रकारे पुन्हा घरी जातात यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी वाढत्या प्रदूषणाची जाणीव होण्यास मदत होत आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या सह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सायकल व पायी चालत शाळेत येताना विद्यार्थी

Breaking News

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा योग आला.

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा...

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...