महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथील विद्यार्थी सालिक शेख याने फेब्रुवारी २०२५ च्या इयत्ता १० वी (SSC) परीक्षेत ९४.२०% गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.तसेच आपली आई फिरदोस शेख व वडील तौफिक शेख यांचे नाव उज्ज्वल केले आहे.सालिक याच्या या उल्लेखनीय यशामागे त्याचा सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ आहे.
या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कारीगर रिजवान, शिक्षकवृंद, संस्थेचे अध्यक्ष सादीक काझी व पदाधिकारी, जमाअतुल मुस्लिमीन कडवईचे अध्यक्ष व सदस्य, तसेच ग्रामस्थांनी सालिकचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सालिकने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा आशीर्वाद आणि स्वतःच्या मेहनतीला दिले आहे. त्याचे पुढील शैक्षणिक जीवनही तितकेच यशस्वी होवो, हीच अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथील विद्यार्थी सालिक शेख याने फेब्रुवारी २०२५ च्या इयत्ता १० वी (SSC) परीक्षेत ९४.२०% गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.तसेच आपली आई फिरदोस शेख व वडील तौफिक शेख यांचे नाव उज्ज्वल केले आहे
