लांजा*लांजा- कुर्णे येथील खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २४ तासात छडा;...

*लांजा- कुर्णे येथील खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २४ तासात छडा; एकजण ताब्यात

रत्नागिरी :- लांजा तालुक्यातील कुर्णे येथील खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २४ तासात छडा लावण्यात यश मिळविले असून, या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनांक 19/01/2026 रोजी सुरेश रामचंद्र पडये वय 45 रा. कुर्णे तालुका लांजा यांचा त्यांच्या राहते घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सदरबाबत लांजा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 03/2026 बी.एन.एस.एस 2023 चे कलम 194 प्रमाणे नोंदविण्यात आलेला होता.

मृतकाच्या अंगावर असलेल्या जखमा तसेच घटनास्थळावरील सांडलेले रक्तावरून सदर मृत्यू हा नैसगिक मृत्यू नसून घातपात असल्याची शक्यता असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांना मार्गदर्शन करुन लागलीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नियुक्त करून त्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळाचे निरीक्षण करून त्याआधारे सदरचा मृत्यू हा नैसगिक नसल्याच्या संशयावरुन पसिरामध्ये सखोल चौकशी व तपास करून गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपीत इसम नंदकुमार रविंद्र पांचाळ वय 25 रा. कुर्णे सुतारवाडी तालुका लांजा यास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांने त्याचा मित्र मयत सुरेश रामचंद्र पडये याने शिवीगाळी केल्याचा राग मनात धरून मयत याचे घरामध्येच त्याला जिवे ठार मारल्याची कबुली दिली आहे.

यावरून लांजा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 16/2026 भा. न्या.सं.चे कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील श्रेपोउनि / श्री. संदीप ओगले, सपोफौ / 1188 सुभाष भागणे, पोहेकॉ / 909 विजय आंबेकर, पोहेकॉ/1407 दिपराज पाटील, चा. पोकॉ/215 अतुल कांबळे या पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.

Breaking News