रत्नागिरीश्री. निलेश जी भगवान सांबरे यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त, आयोजित भव्य...

श्री. निलेश जी भगवान सांबरे यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त, आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीर, वरवडे येथे संपन्न

श्री. निलेश जी भगवान सांबरे यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त, आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीर, वरवडे येथे संपन्न–.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य, संस्थापक / अध्यक्ष सन्माननीय श्री निलेश जी भगवान सांबरे यांचा येत्या १७ एप्रिल ला, ५० वा जन्मदिन.

▪️त्यांच्या ह्या ५० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून, रत्नागिरी विभगा तर्फे, राज्य सचिव श्री केदार चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष ऍड. श्री महेन्द्र जी मांडवकर साहेब, तालुका अध्यक्ष श्री मंदार नैकर साहेब, यांच्या नेतृत्वात गावोगावी , भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

▪️ वाटद, खंडाळा केंद्रातील या भव्य मोफत आरोग्य शिबीराचा शुभारंभ वरवडे गावात झाला.

▪️महाराष्ट्र राज्य सचिव सन्माननीय श्री. केदार चव्हाण साहेब, आणि *श्री. अमर राऊत * यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

▪️या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन वाटद, खंडाळा विभाग प्रमुख सन्माननीय श्री दीपक सांबरे सर यांनी केले.

▪️वरवडे गावचे उपसरपंच सन्माननीय श्री. गजानन हेदवकर सर, श्री. संतोष बोरकर,सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

▪️सोबत, कार्यकर्ते श्री. केशव बलेकर, रत्नसिंधू न्यूज मिडिया च्या संस्थापिका/ संपादिका वर्षा राजे निंबाळकर यांनी आयोजनामध्ये आपले मोलाचे योगदान दिले.

▪️उमेद प्रभागसंघ व्यवस्थापक, वाटद दिक्षा ताई निवळकर, मास्टर CRP सौ. अनुजा ताई सावंत, CRP सौ. शुभांगी ताई वनये यांनी उपस्थित राहून, आयोजकांना शुभेच्छा दिल्या व शिबीराचा लाभ घेतला.

▪️ग्रामपंचायत सदस्या,सौ. सायली ताई माचीवले ग्रामस्थ श्री. चंद्रकांत विचारे यांनीही उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

▪️ वरवडे गावाच्या आशा ताई, सौ. वर्षा जाधव, सौ. पूर्वा आडव, सौ. प्रिन्सी वासावे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

▪️ वरवडे गावाच्या ग्रामस्थांनी ह्या भव्य आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.

Breaking News

राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाखांची पुरवणी मागणी मंजूर

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश विकास निधीत पुन्हा...