बाळ मानेंच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठांनी दिली मान्यता??
👉रत्नागिरी चे माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने यांनी कोकण विधान परिषदेसाठी दाखल केलेला आपला अर्ज अचानक मागे घेऊन महायुती चे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांना बिनविरोध निवडून दिल्या ने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळासाहेब माने यांची पक्षातुन हकालपट्टी केली आहे.. त्यामुळे आता बाळासाहेब माने पुन्हा भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.. कालच मुंबईतून मंत्री नितेश राणे यांच्या विमानातून खास अर्ज मागे घेण्यासाठी रत्नागिरीत आले. अर्ज मागे घेतला. तसेच त्याच विमानातून मंत्री नितेश राणे यांच्यासह मुंबईत गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत बाळ माने यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होईल असे सांगण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच स्वतः नितेश राणे यांनी बाळ माने यांचे मन वळवले. ठाकरे सेनेचे अस्तित्व संपवणे हाही अजेंडा आहे.
दरम्यान, बाळ माने यांचा फॉर्म भरताना सोबत असलेले भास्करराव जाधव यांचा या सर्व राजकीय घडामोडीत काय रोल आहे का? की ते अनभिज्ञ् आहेत याबाबत ठाकरे गट शिवसेनेतून चर्चा होताना दिसते आहे. स्वतः भास्करराव दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. बाळ मानेही मुंबईतच होते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे…
